
गोरेगांव -तालुक्यातील मुंडीपार येथील अंगणवाडी मध्ये दि.15 सप्टेंबर रोजी महिला व बालकल्याण विकास प्रकल्प सेवा योजना अंतर्गत पोषण अभियान राबविण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. पोषण अभियान मध्ये विविध पोषणयुक्त आहारांची उत्कृष्ठ रित्या मांडणी करण्यात आली होती. गरोदर माता,स्तनदा माता, 0 ते 0३ वर्षेपर्यंतची बालके यांना पोषण आहार कसा द्यावा , गरोदर मातांनी गरोदर पणात शरिराची काळजी कशी घ्यावी याविषयी अंगणवाडी सेविका यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शक तत्वानुसार दि.१ ते ३० सप्टेंबर दरम्यान मुंडीपार येथील अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात आले. अभियान काळात सँम मँम बालकांची काळजी घेणे, गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे, जनजागृती करणे, ग्रुहभेटी व वजन यावर भर देणे,एक हजार दिवसांचे महत्त्व पटविणे, कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे,किचन गार्डन बनविण्यावर भर देणे यासह अन्य उपक्रम महिनाभर राबविण्यात आले.अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका सह बचत गटाच्या महिला यांच्या उपस्थितीत सही पोषण- देश रोशन अशी घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, बचत गटाच्या महिला, गरोदर माता व स्तनदा माता यांच्यासह अन्य लाभार्थी उपस्थित होते.





