35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन होणार-आ.डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नाला यश

२६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन होणार-आ.डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नाला यश

0
30

blank

भंडारा -जिल्ह्यातील २६ गावांना बॅक वॉटरचा फटका बसत असल्याने त्या २६ गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. विधानसभेत सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर आ. डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाला यश आले असून २६ गावांचे पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी चु. रा. निखारे यांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून प्रचलित नियम / तरतुदी विचारात घेऊन स्वयंस्पष्ट अभिप्रासह सविस्तर अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहे यामुळे गावकर्‍यांनी आ. परिणय फुके यांचे आभार मानले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या ८ व १५ तारखेला आलेल्या अतवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरची पातळी वाढल्यामुळे नदी काठावर असलेल्या खमारी, कारधा, कोथुर्णा, बेटाळा, दवडीपार, खापा आणि सालेबर्डी या गावामधील नागरिकांच्या घरी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. याबाबत नुकतेच आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुरबाधित गावांना भेट देऊन पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. पुरबाधित गावातील सर्व नागरिकांना वारंवार होणार्‍या महापुरामुळे गावात राहणे कठीण झाल्यामुळे गावाचे ऐच्छिक पुनर्वसन करावे अशी मागणी आ. डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली. त्यानुषंगाने, आमदार डॉ. परिणय फुके यांनी अधिवेशन दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भंडारा जिल्ह्यातील २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी केली होती.
कॅबिनेटमध्ये पुनर्वसनाचा विषय घेऊन गावकर्‍यांच्या हितासाठी ऐच्छिक पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावला. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी निखारे यांनी पत्र पाठवून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लवकरच २६ गावांच्या पुनर्वसनाचा मार्गी लागला.

blank