34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News मुंबईत कुख्यात नक्षलवाद्याला बेड्या:एटीएसची कारवाई; कारू हुलास यादववर होते 15 लाखांचे बक्षीस

मुंबईत कुख्यात नक्षलवाद्याला बेड्या:एटीएसची कारवाई; कारू हुलास यादववर होते 15 लाखांचे बक्षीस

0
42

blank

मुंबई– एटीएसने 15 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कारू हुलास यादव याला रविवारी सकाळी नालासोपारा येथून अटक केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने नवासोपारा येथील धानिवबाग येथील रामनगर येथील चाळीवर छापा टाकला.तेथून कारु हुलास याला अटक करण्यात आली आहे. 45 वर्षीय कारू हा मूळचा झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दोडगा गावचा आहे.

महाराष्ट्र एटीएसकडून चांगली कारवाई करण्यात आली आहे. 15 लाखांचे बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. झारखंड पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून आता त्याला झारखंड पोलिसांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

चौकशीत कारूने 2004 पासून प्रतिबंधित माओवादी गटाचा सक्रिय सदस्य असल्याची कबुली दिली आहे. त्याने आतापर्यंत 30 हून अधिक गुन्हे केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो मुंबईत उपचारासाठी राहत होता.

त्याच्या अटकेची माहिती महाराष्ट्र एटीएसने झारखंड पोलिसांना दिली असून आरोपीची चौकशी सुरू आहे. तो मुंबईत उपचारासाठी आला होता आणि नालासोपारा येथे लपून राहत होता. एटीएसच्या म्हणण्यानुसार, 2004 मध्ये सीपीआयमध्ये आल्यानंतर आरोपींनी अनेक घटना घडवून आणल्या.

blank