34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरींना बैठकीतून बाहेर...

राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरींना बैठकीतून बाहेर काढले?

0
51

blank

नागपूर- मनसे अध्यक्ष राज ठाकरें विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी सकाळी ट्रेनने नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान पक्षबांधणीसाठी पोहोचलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कानमंत्र दिला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या सक्रीय झाले आहेत.

नागपूरमध्ये राज ठाकरेंकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत राज ठाकरेंनी बदल निसर्गाचा नियम आहे, तो निश्चित होईल असा विश्वास व्यक्त करताना कार्यकर्त्यांना पक्षबांधणी, तळागळात पक्ष मजबूत करा असा सल्ला दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांची रविभवनात आज गर्दी उसळली. परंतु मोजक्या पदाधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप असल्याने प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांना बैठकीतून बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.मनसे प्रमुख राज ठाकरे हे पाच दिवसासांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते नागपुरात रेल्वेगाडीने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी रविभवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. यात त्यांनी नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने रविभवन येथे आले होते. परंतु, सभागृहात निवडक पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली. ठाकरे हे चंद्रपूर आणि अमरावती येथे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.

blank