कास्ट्राईब कर्मचारी – शिक्षक – अधिकारी सहविचार सभा संपन्न

0
33

गोंदिया,दि.19ः कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा गोंदिया ची सहविचार सभा दिनांक १८ सप्टेंबर रोजी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया येथे घेण्यात आली. सभेत कास्ट्राईबच्या ध्येय धोरणावर व संघटन वाढविण्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
सभेत अध्यक्षीय भाषणात संजय उके यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ मा. कृष्णा इंगळे साहेबांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. कास्ट्राईब विषयी समर्पित भावना, निष्ठा ठेवून संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी तन मन धनाने कार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक प्रविण गजभिये जिल्हा सरचिटणीस महासंघ होते. प्रमुख अतिथी भरत वाघमारे, हितेंद्र रामटेके, पी. ए. शेगोकार, तेजराम गेडाम, उमा गजभिये, विरेंद्र भोवते, किशोर डोंगरवार होते. सभेचे प्रास्ताविक रोशन गजभिये यांनी केले. संचालन संजय मेश्राम व आभार प्रदर्शन विरेंद्र भोवते यांनी केले. यावेळी सर्व प्रमुख अतिथी, जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षण विरोधी ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून पदोन्नती आरक्षण पूर्वरत लागू करणे, कास्ट्राईब च्या ४ ऑक्टोंबर २०२२ ला नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणे, संघटन शक्ती वाढविणे व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, प्रविण गजभिये, भरत वाघमारे, शिक्षक संघटनेचे राजेश गजभिये, किशोर डोंगरवार, संजय रामटेके, दिक्षांत धारगावे, डी. डी. रामटेके, संजय मेश्राम, अजित रामटेके, यज्ञराज रामटेके, कु. रेखा वाहने, महासंघाचे जितेंद्र बोरकर, रितेश शहारे, आनंद डोंगरे, कु.नम्रता रंगारी, एस. टी. भालेकर, शिक्षक संघटनेचे अनिल मेश्राम, अविनाश गणवीर, अजय शहारे, आशिष वंजारी, सौ.किरण कठाणे, अमित गडपायले मोठ्या संख्येने जिल्हा – तालुका पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.