नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे यांनी घेतली अंगणवाडी केंद्र क्र.सात दत्तक

0
16

अर्जुनी मोर. – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडा निमीत्य केंद्रिय महीला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपुर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या आदर्श अंगणवाडी अभियान अर्जुनी मोर. तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे विशेष मार्गदर्शनात उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. त्यानिमित्य अर्जुनी मोर. नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा मधील अंगणवाडी केंद्र क्र. सात नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे यांनी दत्तक घेतले असुन सदर अंगणवाडी स्मार्ट करणायाचे दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणा-या आदर्श( स्मार्ट )अंगणवाडी केंद्र यामधे अंगणवाडी केंद्राना असणा-या मुलभुत सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी, बाल शौचालय,क्रीडांगण, खेळाचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, विज, पंखे,अशा अत्याधुनिक सोयीसुविधा अंगणवाडी यावर भर दिला जाणार आहे. किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा मातांना नियमीत पोषण आहार, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे नियमीत वजन,लसीकरण, व पोषण आहार, कुपोषीत व अतीकुपोषीत मुलांची विशेष देखभाल व नियमित पोषण आहार, हा या आदर्श अंगणवाडी अभियानाचा भाग राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी दिली.आदर्श अंगणवाडी अभियान यशस्वी रित्या राबविण्यासाठी अर्जुनी मोर नगरपंचायत च्या उपाध्यक्ष ललिता देवेंद्र टेंभरे यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील अंगणवाडी केंद्र क्र. ७ दत्तक घेतले असुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त सदर अंगणवाडी ला एक मोठी सतरंजी भेट दिली आहे.या अंगणवाडी चा चेहरा मोहरा बदलवून मुलभुत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन उपाध्यक्ष ललिता टेंभरे यांनी दिले आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्या रचना गहाणे , भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, माजी नगरसेवक व गटनेते देवेंद्र टेंभरे, नगरसेवक यशकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष गिता ब्राम्हणकर, नगरसेविका ममता भैय्या, सपना उपवंशी, इंदुबाई लांजेवार, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हा महामंत्री मिनाताई शहारे , महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष रचना वकेकार, कुंदाताई डोंगरवार, तथा अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा महासचिव व्यंकट खोब्रागडे, विनोद नाकाडे, माजी नगरसेवीका वंदना जांभुळकर, वंदना शहारे, अंगणवाडी सेविका, मदतनीस व अन्य महिला उपस्थित होते.