40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भंडारा-गोंदिया जिल्हा दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भंडारा-गोंदिया जिल्हा दौऱ्यावर

0
61

blank

भंडारा, दि. 19 : महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे उद्या दि.20  रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.मंगळवारी सकाळी 8.30 वाजता पवनी येथील गांधी गेट चौक येथे आगमन. सकाळी 9.30 वाजता कोंढा कोसरा येथील चंद्रकात उके, पंढरी भुरले, गिरजाबाई भुरले, नामदेव कावळे, अजिज शेख, राजु डाफरे, अशोक कुर्जेकर व सतरंज गजभिये यांच्या शेतातील धानपीक नष्ट झालेल्या बुडीत क्षेत्राची पाहणी. सकाळी 10.30 वाजता भंडारा तालुक्यातील आंबाडी व मानेगाव येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट. सकाळी 11 वाजता भंडारा येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व सकाळी 11.30 वाजता गोंदियाकडे प्रयाण.

blank