34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मुर्री येथील निवासी मुलांच्या शाळेत पद्मभूषण कर्मवीर पाटलांची जयंंती साजरी

मुर्री येथील निवासी मुलांच्या शाळेत पद्मभूषण कर्मवीर पाटलांची जयंंती साजरी

0
22

blank

गोंदिया,दि.23ः- तालुक्यातील नंगपुरा मूर्री येथील अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा मूर्री येथे पद्मभूषण शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. इठूले अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून के. बी. बिसेन, श्रीमती एन. जे. भलमे उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरवात अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमा दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सहाय्यक शिक्षक एस. बी. बगमारे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “माणसाचे कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे तेव्हा तुम्ही चांगले कर्म करा आणि कर्मवीरा प्रमाणे कर्मवीर व्हावे”. असा मोलाचा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. के. तेलंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस. पी. पारधी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

blank