36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुरतर्फे क्षय रुग्णांना अन्नधान्य किटचे वाटप

भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुरतर्फे क्षय रुग्णांना अन्नधान्य किटचे वाटप

0
37

blank

सिंदेवाही:भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने क्षयरोग मुक्त भारत २०२५ या सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत खा.अशोक नेते यांच्याकडून क्षय रुग्णांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खा.अशोक नेते बोलतांना भारत हा देश २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त झाला पाहिजे.हे स्वप्नं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आहे.ते पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा ( NGO). एनजीओ यांनी पुढाकार घ्यावा. या योजनेत सामील व्हावे. आणि या देशाला विश्ववात एक नंबरचा देश झाला पाहिजे असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, ओबीसी आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, डॉ.साठे,या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले.या प्रसंगी ता.अध्यक्ष राजेंद्र बोरकर, माजी सभापती नागराज गेडाम, तहसिलदार गणेश जगदाळे, बिडिओ अक्षय सुकरे,थानेदार घारे , भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष देवराव कोठेवार ,रितेश अलमस्त, डॉ.साठे जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ मानकर, किशोर मानुसमारे,मनोहर सहारे ता.महामंत्री,मधुकर मडावी ,अरविंद राऊत , किशोर भरडकर, देवा मंगलवार,आशिष चिंतलवार, पुस्तोडेताई नगरसेविका, चिंतलवारताई नगरसेविका,तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

blank