37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Featured News उमरेड-कर्‍हांडल्यात तेंडुलकरने कुटुंबीयांसह केली जंगलसफारी

उमरेड-कर्‍हांडल्यात तेंडुलकरने कुटुंबीयांसह केली जंगलसफारी

0
28

blank

नागपूर दि.21: भारतरत्न खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास  जिल्ह्यातील उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात भ्रमंती केली. या दौर्‍यात सचिनने पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांच्यासह अभयारण्यात भ्रमंतीचा एकदा नव्हे तर दोनदा आनंद लुटला. जंगल भ्रमंतीसाठी पहाटेपासूनच आलेल्या पर्यटकांनाही सचिन येणार असल्याची माहिती नव्हती. तर वन विभागानेही सचिनचा दौरा अतिशय गुप्त ठेवला होता. वाघाच्या दर्शनासाठी आलेल्या सचिनला मात्र वाघोबाचे काही दर्शन न झाल्यांने त्यांची निराशा झाली.
सचिन त्याच्या कुटुंबीयांसह शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाला. त्यानंतर लगेच उमरेडनजीकच्या एका हॉटेलात त्यांचा रात्री मुक्काम होता. पहाटेच्या सुमारास तेंडुलकर कुटुंबीयांनी वनविभागाच्या विश्रामगृहालगत असणार्‍या प्रवेशद्वारातून अभयारण्यात ‘एन्ट्री’ केली. दरम्यान, जंगलभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना जंगलात सचिन दिसताच अनेकांनी वाघाला सोडून सचिनलाच अधिक पसंती दिली. ‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

blank