अंधश्रद्धेचा कहर; काळ्या धनाच्या नावावर महिलेची लुट,3 आरोपी ताब्यात

0
69

गोंदिया,दि.29:– देवरी तालुक्यातील सालई ( फुटाना) गावातील खेलनबाई मधुकर सलामे यांचा घरात काळा धन असल्याचे सांगत साकोली तालुक्यातील सानगडी येथील तिघांनी ८५ हजारांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.यामध्ये सुरेश नारायण गिरी (५१),अरविंद सुरेश गिरी (२२), रामदास शंकर पुरी (५८), तिन्ही राहणार सांनगडी ता.साकोली, जि. भंडारा यांचा समावेश आहे. सदर घटनेची तक्रार महिलेनी देवरी पोलीस स्टेशनला केली असता पोलीस निरीक्षक रेवचंद सिगंनजुडे यानीं चक्र फिरवत तिन्ही आरोपीनां सौदंड येथून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, खेलनबाई सलामेची प्रकृती बरी राहत नसल्याने सुरेश नारायण गिरी (५१),अरविंद सुरेश गिरी (२२), रामदास शंकर पुरी (५८) या आरोपींनी खेलनबाईस तुझी प्रकृती दुरुस्त करुन देतो असे बोलुन तिच्या घरी येऊन पुजापाठच्या नावावर पैसे घेतले. नंतर तिंन्ही आरोपीनी तुझे घरी गुप्तधन आहे तो काढावा लागेल नाही तर घरातील एका व्यक्तीचा जिव जाईल अशी भिती दाखवुन अंधश्रध्देचे नावाखाली संगणमत करुन खेलनबाईची दिशाभुल केली.तोपर्यंत नगदी ८५,०००/रु. घेवून फसवणुक केली होती. यात दोन ते चार वेळा साकोली येथे पैसे घेवून खेलनबाईला बोलावले होते.त्यातच परत २८ सप्टेबंर २०२२ रोजी खेलनबाईला तिघांनी पैशाची मागणी केली. त्यावर खेलनबाईने ही संपुर्ण घटना देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यानां सांगितले.त्यावर मला रुपये १२,००० घेवून साकोली येथे बोलावल्याचे सांगतिले.त्यावर सिंगनजुडे यानीं सापळा रचत सपोनि घाडगे व पोलीस स्टाफ यांना खेलनबाईसह रवाना केले.आरोपी सुरेश नारायण गिरी ,अरविंद सुरेश गिरी यांना खेलनबाईने श्रीरामनगर सौंदड येथे पैसे घेण्यासाठी बोलाविले असता ते दोन्ही आरोपी सौंदड येथे फिर्यादीकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.तर तिसर्या आरोपीला देवरी पोलिसानीं आज 29 सप्टेंबरला ताब्यात घेतले.

तिन्ही आरोपीवर २८९/२०२२ कलम ४२०, ५०८, ३४ भादंवि सह कलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अतंर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीनां ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपीकडुन देवरी पोलिसानीं एकुन १,५२,०००/रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.