घरफोडी-चोरी मधील 1 लॅपटॉप व 2 मोबाईल पोलिसांनी फिर्यादीला केले परत

0
27

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील निमगाव येथे राहणाऱ्या अनुरथा दिलीप मेश्राम यांच्या घरी अज्ञात आरोपींनी घरफोडी-चोरी करून 1 लॅपटॉप व 2 मोबाईल असा एकूण 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले. याबाबतची तक्रार 30/08/2022 रोजी दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली.

ठाणेदार सोमनाथ कदम यांनी तात्काळ गुन्हा रजि. नं. 207/2022 IPC 454, 457, 380, 34 प्रमाणे दाखल करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने अवघ्या 8 तासांमध्ये दोन आरोपी 1. महेंद्र सुखदेव खोब्रागडे 2. राकेश सुभाष भानारे यांना अटक केली होती. अटक आरोपींकडे कसून तपास करून चोरी केलेला 1 लॅपटॉप व 2 मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले होते.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोर यांच्या आदेशान्वये काल ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या हस्ते फिर्यादी यांना त्यांचा 1 लॅपटॉप व 2 मोबाईल परत करण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, सपोनि संभाजी तागड, परि. पोउपनि संतोष गुट्टे, पोहवा आनंदराव इस्कापे ब.न.488, पोना महेंद्र पुण्यप्रेडिवार ब.न.227, पोना. रमेश सेलोकर ब.न191, पोना प्रवीण बेहरे ब.न.316, पोना राहुल चिचमलकर ब.न.1756, पोशि श्रीकांत मेश्राम ब.न.1896, पोशि गौरीशंकर कोरे ब.न.1642, पोशि रामलाल राऊत ब.न.1910, पो.ना. विजय कोटांगले ब.नं. 1394,  सायबर सेल गोंदियाचे पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी केलेला आहे.