स्पिरीट व रसायनाच्या माध्यमातून तयार केली जात होती दारू

0
49

गोंदिया : खातिया येथील एका कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी २ ऑक्टोबरला धाड टाकून मोठ्या प्रमाणात
बनावट दारूचा साठा जप्त केला. तसेच,दारू तयार करण्याचे साहित्य सुद्धा जप्त केले. त्यात दारू तयार करण्याला लागणारे रसायन वापरले जात होते. हे रसायनयुक्त दारू प्यायल्याने लोकांना विषबाधा देखील होऊ शकते.स्पिरीट,
अल्कोहोलचे रंग फ्लेवर मिक्स करून बाटलीत भरून बनावट लेबल लावून विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब
पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
गोंदिया तालुक्यातील खातिया येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री
करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून
३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व साहित्य जप्त केले. या प्रकरणात आरोपी सुभाषचंद दिनेशचंद पालीवाल ( ४८ ) रा.कुकापूर, ता.बाह,जि.आग्रा ( उत्तर प्रदेश) ह मु. खातीया,ता.जि.गोंदिया , राजेश सुनील यादव (२८) रा. जानकी हॉस्पिटलच्या बाजूला , मरारटो ली , संदीप आमोद चंद्रिकापुरे(२३) रा.जुने लक्ष्मी नगर, बुद्ध वाॅर्ड,गोंदिया, तरुण राजेश टेंभुर्णे (२३) रा. जुने लक्ष्मी नगर, चंद्रशेखर वाॅर्ड, गोंदिया व प्रकाश गोवर्धन अग्रवाल (४७) रा. कामठा ग्रामपंचायतजवळ, कामठा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींवर भादंविच्या कलम ३२८ ,सहकलम ६५ (ब) (क)(ड) (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा
दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून ते फरार असल्यामुळे त्यांना अटक
करण्यासाठी पीसीआर मागण्यात आला.न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे करीत आहेत.