शूटिंग रेंजचे लोकार्पण व पॉलिग्रास मैदान बांधकाम भूमिपूजन 10 ऑक्टोबरला

0
41

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते लोकार्पण

गोंदिया दि. 8 :  जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे नाविन्यपुर्ण योजनेतून तयार करण्यात आलेल्या शूटिंग रेंजचा लोकार्पण सोहळा व पॉलिग्रास मैदान बांधकाम भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

        जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे नाविन्यपुर्ण योजना सन 2021-22 मध्ये शुटींग रेंज अत्याधुनिक साहित्यासह तयार करण्याकरिता रु. 75 लक्ष इतका निधी, तसेच पॉलीग्रास फुटबॉल मैदान तयार करणे करिता 2 कोटी 06 लाख 98 हजार 345 रुपये इतका निधी जिल्हा क्रीडा संकुल समितीला मंजुर व प्राप्त झालेला आहे. सदर प्राप्त झालेल्या निधीतुन जिल्हा क्रीडा संकुल येथे शुटींग रेंज अत्याधुनिक साहित्यासह तयार करण्यात आलेले आहे.

       शूटिंग रेंजचा लोकार्पण सोहळा 10 ऑक्टोबर 2022 रोजी दु. 1 वाजता राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री, पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदिया सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुल येथील पॉलीग्रास फुटबॉल मैदानाच्या बांधकामाचा भुमीपुजन समारंभ याचवेळी संपन्न होणार आहे.

          सदर कार्यक्रमाप्रसंगी खासदार, आमदार व जिल्हयातील इतर लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी गोंदिया जिल्हयातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरीक, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांनी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  घनश्याम राठोड यांनी केले आहे.