नितीश कुमारांच्या बोटीला अपघात:गंगा नदीत जेपी सेतूला धडकली, नितीश जखमी

0
43

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे स्टीमर (बोट) शनिवारी गंगा नदीतील जे पी सेतुला धडकले. या घटनेत नितीश किरकोळ जखमी झालेत. नितीश यांच्यासोबत काही उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते. वेळीच त्यांना दुसऱ्या स्टीमरने गंगा नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी प्राणहाणी टळली.

छट पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेले होते

नितीश कुमार शनिवारी छट पुजेपूर्वी गंगा नदीच्या घाटांची पाहणी कर्यासाठी गेले होते. ते एका छोट्या बोटीतून गंगा नदीत गेले होते. पाण्यात हेलकावे बसल्यामुळे त्यांची बोट जे पी सेतुच्या एका खांबाला धडकले. त्यामुळे बसलेल्या धक्क्यामुळे नितीश कोसळले. त्यात त्यांना किरकोळ इजा झाली. या घटनेमुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली.

सुदैवाने नितीश यांच्या स्टीमरसोबत दुसरे एक स्टीमर होते. त्या स्टीमरच्या माध्यमातून त्यांना किनारी आणण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत काही सरकारी अधिकारीही उपस्थित होते.

गंगा नदीला पूर

गंगा नदीला सध्या मोठा पूर आला आहे. त्यामुळे बोट जे पी सेतुच्या पिलरला धडकताच नितीश यांची बोट पाण्याच्या प्रवासोबत वाहत जात होती. पण अधिकाऱ्यांनी नितीश यांना दुसऱ्या बोटीद्वारे सुखपूर किनाऱ्यावर आणले.