
👉तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन यांची नियुक्ती ?
👉 हा मेसज होतो आहे सोशल मिडियावर चुकीचा व्हायरल*
गोंदिया,दि.३०:::👉महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी करून आता त्यांच्या जागेवर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली असल्याने एकच चर्चा सुरू होती आहे.
मात्र आता ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवन येथील सूत्रांकडून राज्यपालांची बदली झाल्याच्या सर्व चर्चांचे आता खंडन केले आहे. अद्यापही महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून कोश्यारी कायम आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
👉5 सप्टेंबर 2019 रोजी कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान झाले होते. त्यांची कारकीर्द तीन वर्षात वादळी आणि वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारशी असहकार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. मविआने सांगितलेल्या राज्यपालनियुक्त बारा आमदारांची त्यांच्याकडून नियुक्ती झाली नाही. यावरून बराच गदारोळ माजला होता. महाविकास आघाडीकडून कोश्यारींची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी अनेक वेळा मागणी केली आहे.
👉राज्यपालपदी म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही त्याच राज्यातील व्यक्ती नसावी, असा आजवरचा सर्वसाधरण संकेत आहे.एखाद्या राज्याचा राज्यपाल ही त्या राज्याची व्यक्ती नसेल, असा नियम पाळला जातो. महाजन यांचा जन्म हा महाराष्ट्रातला आहे. महाजन याचं माहेर ही महाराष्ट्रातलं आहे, तर त्यांचं सासर हे मध्यप्रदेश आहे. यामुळेच त्यांचं सदरच्या दोन्ही राज्यात राज्यपापदी नियुक्ती होणं, तांत्रिकदृष्ट्या शक्य होणारे नाही. यामुळे सोशल मीडियावरची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे.
👉महाजन यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून या ठिकाणी झाला. काही काळाने महाजन कुटुंब मुंबईत स्थिरसावर झालं. सुमित्रा महाजन यांचा विवाह इंदूरचे अधिवक्ते जयंत महाजन यांच्याशी झाला. म्हणून विवाहानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. १९८९ ते २०१९ अशा सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदार संघातून त्या निवडून आल्या. लोकसभेचं अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.
👉🅾️👉महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन यांची नियुक्ती ?👉👉 हा मेसज होतो आहे व्हायरल*
*महाराष्ट्राच्या राज्यपालपदी मध्य प्रदेशातील इंदुर शहरातून सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या आणि १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची नियुक्ती झाल्याचे मेसज सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या नियुक्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. याअगोदरही सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्र व मध्य प्रदेशरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे मेसेज दोन वर्षापूर्वी व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी दरम्यान सुध्दा त्यांच्या नावाची चर्चा होती.यावेळेस त्यांच्या राज्यपालपदाचे हे मेसज व्हायरल होत आहे. पण, त्याला अधिकृत कोणीच दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे हे मेसेज भाजपचे कार्यकर्ते सर्वत्र पोस्ट करत असून त्यात ते महाजन यांचे अभिनंदन करत आहे.
*👉हा आहे मेसेज*
*मध्य प्रदेशातील इंदोर शहरातून सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या आणि १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षा, आदरणीय श्रीमती सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्र च्या राज्यपाल म्हणून नियुक्ती ..!!*
*अभिनंदन ..!! अभिनंदन ..!! त्रिवार अभिनंदन ..!!*