
नांदेड-केदारनाथला दर्शनासाठी मी गेलो तेव्हा मला आरएसएसचे एक नेते भेटले. त्यांना मी विचारले की, केदारनाथाकडे काय मागितले, ते म्हणाले, ”मी सदृढ आरोग्य मागितले.” मी मनात पुटपुटलो की,”तुम्ही जर केदारनाथला पायी आले असते, तर सदृढ आरोग्य मिळाले असते.” मी भगवान शंकराजवळ गेलो आणि नतमस्तक होत धन्यवाद दिले आणि देवाला म्हटले, ”मला तुम्ही रस्ता दाखवला.” हा फरक आहे आरएसएस आणि काॅंग्रेसमध्ये आहे. गांधी आणि सावरकरांमध्ये. आम्ही सांगत नाही करतो असा टोला काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नांदेड येथे लगावला.
काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे. आज नांदेड येथे राहुल गांधींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सभेला संबोधन केले.‘देशाला समजून घ्यायचे असेल तर रस्त्याने चालावे’ भारत जोडो यात्रेतून व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना समजून घेत आहे. देशाला समजायचे असेल तर रस्त्याने चालावे लागते. रस्ता ही समजतो आणि रस्त्याने राज्याचा दर्जा समजतो, असे खासदार राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेदरम्यान, कृष्णूर येथील कॉर्नर मिटींगमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नोटबंदीने आर्थिक त्सुनामी आली. नोटबंदी निर्णय नाही स्टंटबाजी होती. छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आहे. गुजरात निवडणुकीमुळे रोजगार हिसकावून घेतला जात आहे. भाजप, विश्व हिंदू परिषद जातीवाद पसरवत आहे. देशात प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नाही. यामुळे कारखानदार रोजगार देत नाहीत. युवक बेरोजगार होतील. लोकांची ताकद व प्रेम यामुळे काश्मिरपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार असून कुणीही घाबरू नका, असेही राहुल गांधी म्हणाले.

मी सांगून टाकू का?
आज सभेत जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ”मी एक किस्सा सांगतो, खरंच सांगू का? मी केदारनाथला गेलो. तेथील मुख्यमंत्री मला म्हणाले की, हेलिकाॅप्टरने केदारनाथ जाऊ शकता. मी म्हटलो नाही, मी पायीच जाणार. मी सांगीतले की मी भगवान शंकराच्या मंदिरात जात आहे जे सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांच्यासाठी मी पंधरा किमी चालु शकत नाही का?”
LIVE: Public Meeting | Bharat Jodo Yatra | Nanded | Maharashtra https://t.co/j9gy4mBbGr
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 10, 2022
मला आरएसएसचे नेते भेटले
राहुल गांधी म्हणाले, ”मी पायी गेलो. खूप थंडी होती. केदारनाथला जात आहोत याची अनुभूती थंडीमुळे होते. मी मंदिरात जाताना आरएसएसचे नेते मला भेटले. मी त्यांना नमस्कार घातला. (त्यांचे वजन सुमारे शंभर किलो असेल) आम्ही आत जाताना त्यांच्या बाजूने एक नोकर होता. नोकराच्या डोक्यावर मोठी फळाची टोपली होती. मी पाहिले आणि म्हणालो, सर हे काय? ते म्हणाले, मी शंकराच्या चरणावर ठेवण्यासाठी फळ नेत आहेत. मी विचार केला अन् मनातच पुटपुटलो. ”तुम्ही नाही तुमच्या नोकराने आणले.”
..तर सृदृढ आरोग्य मिळाले असते
राहुल गांधी म्हणाले, ”मी म्हटलो, आपण सर्वात मोठ्या तपस्वीच्या मंदिरात आलात. तेही हेलिकाॅप्टरने..ते शांत बसले. मी म्हटलो शंकराला काय मागितले तेव्हा ते म्हणाले, मी सदृढ आरोग्य मागितले. मी मनात पुटपुटलो की,”तुम्ही जर केदारनाथला पायी आले असते तर सदृढ आरोग्य मिळाले असते.”

भगवान शंकरापुढे मी नतमस्तक
राहुल गांधी म्हणाले, ”मी भगवान शंकराला काहीच मागितले नाही. पण शंकरापुढे मी नतमस्तक झालो आणि धन्यवाद दिले मी म्हटलो की, मला तुम्ही रस्ता दाखवला. हा फरक आरएसएस आणि काॅंग्रेसमध्ये आहे. गांधी आणि सावरकरमध्ये आहे. आम्ही सांगत नाही करतो. आपण महापुरुषांसमोर हात जोडतो आणि धन्यवाद देतो कारण त्यांनी आपल्याला जगण्याचा मार्ग सांगितला, दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत पाठिंबा दर्शवला.@supriya_sule #BharatJodoYatra pic.twitter.com/mmTi2b5Dwu
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 10, 2022
सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आव्हाड सहभागी; राहुल गांधींसोबत पदयात्रा
काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते सहभागी झाले.नांदेड येथील देगलूरनाका येथे भारत जोडो यात्रा पोहचली असून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी आहेत. यावेळी यात्रेत सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत स्वःत सेल्फीही घेतली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी येथून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आहे. काॅंग्रेसचा मित्रपक्ष असलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा समावेश नसेल हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाले. ते राहुल गांधी यांच्यासह चालताना दिसले.

आदित्य ठाकरे सहभागी होणार
महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे हेही आज सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. आज राहुल गांधींची सभा हे यात्रेतील आकर्षण आहे.
अभूतपूर्व गर्दी अन् उत्साह
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत.
मी सात तास लोकांचे ऐकतो
भारत जोडो यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात आली, त्यादिवशी रात्री राहुल गांधी म्हणाले होते की, मी दिवसांतील सात तास मी लोकांचे ऐकतो आणि त्या प्रश्नावर मी अर्धातास रात्री बोलतो. महागाई आणि बेरोजगारीवर राहुल भर देत आहेत. या महिला आणि लहान मुलांशी राहुल गांधी यांनी संवाद साधताना दिसत आहेत.
असा आहे पुढील कार्यक्रम
- भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिम येथून मार्गक्रमण करेल.
- नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे झाला. गुरुवारी- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.
- नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.





