40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home विदर्भ १४ नोव्हेंबरपासून सार्वजनिक वाचनालयात व्याख्यानमालेचे आयोजन

१४ नोव्हेंबरपासून सार्वजनिक वाचनालयात व्याख्यानमालेचे आयोजन

0
26

भंडारा : सार्वजनिक वाचनालय भंडाऱ्याच्यावतीने ग्रंथालय सप्ताह निमित्त १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत विविध विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रनाथ सभागृहात १४ नोव्हेंबरपासून दररोज संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित या व्याख्यानमालेत १४ नोव्हेंबरला ‘वारकरी संप्रदाय : विठ्ठल पांडुरंग’ या विषयावर नागपूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.मधुकरराव जोशी यांचे भाषण होईल. १५ नोव्हेंबरला प्रसिद्ध विचारवंत डॉ. कोमल ठाकरे हे ‘महाराष्ट्रातील संत परंपरा’ या विषयावर आपले विचार मांडतील. १६ नोव्हेंबरला भंडारा येथील सुप्रसिद्ध लेखिका हर्षदा भुरे यांच्या ‘धरती अबा वीर बिरसा मुंडा’ व ‘समर्पण’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.म.प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे हे राहतील प्रमुख वक्ते म्हणून मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार व समीक्षक रवींद्र शोभणे हे उपस्थित राहणार आहेत. १७ नोव्हेंबरला ‘स्पर्धा परीक्षेतील नोकरीची संधी’ या विषयावर राकेश राखडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. १८ नोव्हेंबरला ‘स्वातंत्र्योत्तर काळातील मातृशक्तीचे योगदान’ या विषयावर सौ. स्नेहल खानापुरकर यांचे भाषण होईल. १९ नोव्हेंबरला ‘गौतम बुद्ध’ या विषयावर नागपूर येथील भंते ज्ञानबोधी हे आपले विचार मांडतील. २० नोव्हेंबरला सकाळी ११.०० वाजता रोगनिदान शिबिर व चिकित्सा केली जाईल याप्रसंगी डाॅ. वेदप्रकाश गहुकर, डॉ. उज्वला गहुकर हे रोगनिदान व चिकित्सा करतील.
या व्याख्यानमालेचा भंडारा शहरातील रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यानमालेचे आयोजक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, कार्यवाह डाॅ.जयंत आठवले, प्रदीप गादेवार यांनी केले आहे.