
गोंदिया,दि.16ः महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने आज 16 नोव्हेबंरला राज्यातील विविध जिल्हापरिषदातील वर्ग 3 मधील कर्मचार्यांना पदोन्नती देत महाराष्ट्र विकास सेवा सहाय्यक गटविकास अधिकारी- गट ब(एस-15) या पदावर तात्पुरती पदोन्नती दिली आहे.यामध्ये नागपूर विभागात 30,अमरावती विभाग 21,औरगांबाद 18, व नाशिक विभागातील 10 कर्मचार्यांचा समावेश आहे. यामध्ये गोंदिया जिल्हापरिषदेतील 8 कर्मचार्यांचा समावेश आहे.यामध्ये एच.व्ही गौतम यांना गोरेगाव,एस.पी.डोंगरे यांना मौदा,कु.ए.एम.आयचित आमगाव,किशोर मुळे गोंदिया,डी.एस.लोहबरे नरेगा जि.प.गोंदिया,डी.एम.खोटेले सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे.तर ए.के.गिर्हेपुंजे भंडारा जि.प.पंचायत विभाग व जी.टी.सिंगनजुडे यांची भंडारा पंचायत समितीमध्ये निवड. राज्यातील नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी यांची यादी खालीलप्रमाणे
class 2 pramotion