29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट आणि जी एम बी हायस्कूल येथे इंदिरा गांधी जयंती...

सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट आणि जी एम बी हायस्कूल येथे इंदिरा गांधी जयंती साजरी

0
36

blank

अर्जुनी / मोर:  येथील श्रीमती केशरबाई शिक्षण संस्था द्वारा संचालित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट व जी एम बी हायस्कूल येथे इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या शव्या जैन पर्यवेक्षक मुकेश शेंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. इंदिरा गांधी यांच्या जीवनाविषयी व कार्या विषयी माहिती पल्लवी वाघ यांनी विशद केली.कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रद्धा कापगते यांनी केले. कार्यक्रमाला सांस्कृतिक समितीतील सदस्य व इतर शिक्षक यांनी सहकार्य केले.