ब्रम्हपुरी,दि.22ः- जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील सोनाली सहारे रायपुरे यांना राज्यस्तरीय साहित्य लेखन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.याकरीता सलग एक महिन्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सलग 30 दिवस सकाळचे सदर यात मी माझा सोनशिल्प सदर तसेचं आठवड्यातून दुपारचे तीन सदर असायचे. त्यात काव्य लेखन, आत्मवृत्त लेखन ,ललित लेखन, प्रवास वर्णन वेगवेगळे कठीण विषय असायचे. या स्पर्धेत सोनाली सहारे रायपुरे यांना तृतीय क्रमांक मिळाल्याने गौरविण्यात आले.सोनाली सहारे यांनी पुरस्काराबद्दल जीवन गौरव परिवाराचे व परिक्षक समूह तसेच कुंभारे दादाचे आभार व्यक्त केले आहे.





