विद्युत तारेच्या स्पर्शाने सारस जोडप्याचा मृत्यू

0
99
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-एकीकडे जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने दाखवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठेतरी प्रशासन सारस संवर्धनाकडे दुर्लक्ष करते की काय अशी म्हणायची वेळ आली आहे.कारण आज मंगळवारला गोंदिया तालुक्यातील कामठा येथील आश्रमशाळेच्या परिसरात एका सारस जोडप्याचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सारस संख्या वाढविण्यासाठी जोडपे टिकवणे आवश्यक आहे.मात्र सारसांची संख्या असलेल्या शेतपरिसरात मोठ्याप्रमाणात विद्युत तारांचे जाळे असल्याने त्या तारांना स्पर्श होऊन पक्ष्यांचा मृत्यू होऊ लागले आहे. सारस जोड़ा 5 वर्षाचा होता. सारस नर पक्ष्याची लांबी 5 फूट 8 इंच व मादा पक्ष्याची लांबी 5 फूट 4 इंच एवढी असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृत जोडप्याला वनअधिकारी व सारस प्रेमीच्या उपस्थितीत जाळण्यात आले.5 ते 7 दिवसापुर्वीच या सारस जोडप्याचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असून घटना मात्र आज उघडकीस आली.
आजच्या या घटनेने जिल्ह्यात 2022 मध्ये असलेली 34 ही संख्या आता 32 वर येऊन ठेपली आहे.3 वर्षात दासगाव 2,परसवाडा 1 व पांजरा येथे 1 सारस पक्ष्याचा मृत्यू झालेला होता.आज परत 22 डिसेंबरला दोन सारस पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे.

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी परिसरात असलेल्या विद्युत तारांना आवरण घालणे किंवा केबलचा वापर करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव संवर्धन आराखड्यात सादर करण्यात आला आहे.मात्र यासाठी मोठ्या निधीची गरज असून प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.आज एका जोडप्याच्या मृत्यूमुळे सारस पक्ष्यांच्या संख्या वाढविण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत.त्यावर कुठेतरी अशा घटनेमुळे अडचणी येऊ लागल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी बेरार टाईम्ससोबत बोलतांना सांगितले.