37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य :”महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात”

रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य :”महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात”

0
54

blank

मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद धुमसत असतानाच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एक अतिशय वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेय. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केलेय.

ठाण्यातील हायलँड मैदानात रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजोराच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

काय होता कार्यक्रम?

ठाण्यात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान तर्फे आज मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी योगाचे धडे तर दिलेच, सोबत दीपाली सय्यद, आमदार रवी राणा यांनीही मंचावर हजेरी लावली.

काय म्हणाले बाबा?

रामदेव बाबा म्हणाले की, अमृता फडणवीस यांना व्यायमाचा इतका चार्म आहे. त्यांना इतकी आवडय की, त्या शंभर वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप तोलून-मोजून खातात. आनंदी राहतात. जेव्हा पाहावे मुलासारख्या हासत राहतात. जसे हास्य अमृताजींच्या चेहऱ्यावर असते, तसेच हास्य मी तुमच्या चेहऱ्यावर पाहू इच्छितो.

अन् वादग्रस्त वक्तव्य

रामदेव बाबा पुढे म्हणाले की, तुम्ही खूप नशिबवान आहात. खूप चांगल्या दिसताय. समोरच्याला साडी नेसायची संधी मिळाली. कुणाला ती मिळालीही नाही. खरे तर तुम्ही साडी नेसल्यानंतरही चांगल्या दिसता. सलवार सूटमध्येही छान दिसतात. माझ्यासारखे महिलांनी काही नाही घातलं तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी फडणीस आणि शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या दोघांनी इतिहास रचल्याचे ते म्हणाले.

अमृता फडणवीस 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणखी 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, ठाण्यातील एका कार्यक्रमात स्टेजवर अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केलं. तसंच अमृता फडणवीस या अनेक वर्षे तरुण राहतील, यामागचं कारणही रामदेव बाबा यांनी सांगितलं.अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रचंड इच्छा आहे. त्या नेहमीच मोजून मापून खातात. खुश राहतात. लहान मुलासारखं हसत असतात… त्यामुळे त्या तरुणच राहतील, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं.

blank