
आमगाव,दि.26ः हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवार ला संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवार ला संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बन्सीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या आवृत्ती चे पूजन करण्यात आले, प्रास्ताविकाचे विद्यार्थ्यांकडून वाचन करण्यात आले, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा , घोषवाक्य सवे
प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगितले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बन्सीधर शहारे यांनी संविधानाने दिलेल्या हक्क, अधिकाराचा वापर करताना कर्तव्य पालन ही करावे असे आवाहन उपस्थितांना केले.याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.परमानंद चुटे,के.जी.मडावी,एल.एफ.लांडगे,डि.बी.चव्हान,प्रा.कु.निता कांबळे,व्हि.एम ईलमकर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमा चे सुत्रसंचलन जे.एन.तितीरमारे यांनी केले आभार के.जे.बर्वे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परीश्रम घेतलें.
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

भंडारा, दि. 26 : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाला विशेष महत्व आहे. शासकीय सेवेत नोकरी करतांना उद्देशिका समोर ठेऊन कामे केली पाहिजे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांचासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.






