37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ घाटकुरोडाचे पोलिस पाटील निलंबित

घाटकुरोडाचे पोलिस पाटील निलंबित

0
24

तिरोडा, दि. ४ : अवैध वाळू वाहतुकीला प्रत्यक्ष मदत करीत असल्याचा ठपका ठेवत घाटकुरोडाचे पोलिस पाटील मुन्नालाल शेंडे यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई येथील उपविभागीय दंडाधिकाèयांनी केली.
घाटकुरोडा येथील नदीपात्रात मोठा वाळूसाठा उपलब्ध आहे. या नदीपात्रातून सायंकाळपासून पहाटेपर्यंत अवैध मार्गाने वाळूची तस्करी केली जाते. हा प्रकार पोलिस पाटील मुन्नालाल शेंडे यांना माहीत आहे. असे असतानादेखील ते संबंधित विभागाला माहिती न देता वाळूचोरीला प्रत्यक्ष मदत करतात. ही बाब ८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नायब तहसीलदारांच्या निदर्शनास आली. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शेंडे यांना स्पष्टीकरण मागविण्यात आले. १ मार्चला त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नव्हते. अखेर उपविभागीय दंडाधिकाèयांनी शेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसे आदेश दोन मार्चला दिले.

blank