पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू सरांडीची घटना

0
40

लाखांदूर,दि.03ःअंगणातील पाण्याच्या टाक्यात पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बु.येथे आज शनिवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. सान्वी छत्रपाल कुथे असे मृत बालिकेचे नाव आहे.शनिवारी सकाळी सान्वी ही परिसरातील लहान बालकांसोबत अंगणात खेळत होती.मुलगी खेळत असल्याने आई घरकामात व्यस्त होती.काही वेळात घरकाम आटोपल्यानंतर बघितले असता सान्वी अंगणात दिसली नाही.त्यामुळे आईने शेजारी जाऊन विचारणा केली. मात्र सान्वी कुठेही नसल्याने परिसरात शोधाशोध करण्यात आली.दरम्यान अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत सान्वी पडलेली दिसली.तिला पाहून सान्वीच्या आईने एकच हंबरडा फोडला.सान्वीला पाण्याबाहेर काढून सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.येथे प्राथमिक उपचार करून तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच वाटेत सान्वीचा मृत्यू झाला.या
घटनेने सरांडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.