33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून राजेश खवले यांची नियुक्ती

ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून राजेश खवले यांची नियुक्ती

0
49

blank

 गोंदिया दि. 05: माहे ऑक्टोंबर, 2022 ते डिसेंबर,2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती, नव्याने स्थापीत तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचयतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सदरहू निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार  पाडण्यासाठी  निवडणूक  निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी, गोंदिया राजेश खवले  यांची  नियुक्ती  करण्यात आलेली आहे.

          जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका संदर्भातील मतदार, नागरीकांच्या काही तक्रारी असल्यास, त्यांनी त्याबाबतच्या तक्रारी, निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करावी. असे आवाहन निवडणूक निरीक्षक, राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी  यांनी  केलेले आहे.

blank