34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक युवतींना पोलीस भरती,स्पर्धा परिक्षा, रोजगार या विषयांवर मार्गदर्शन

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक युवतींना पोलीस भरती,स्पर्धा परिक्षा, रोजगार या विषयांवर मार्गदर्शन

0
30

blank

अर्जुनी मोरगाव,दि.15ः- तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र भरनोली कार्यक्षेत्रातील आदिवासी अतिदुर्गम भागातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल  भरनोली गावातील दिपस्तंभ वाचनालयात उप विभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळकर यांनी भेट देऊन वाचनालयातील उपस्थीत असलेले २५-३० युवक, युवतींना आगामी पोलीस भरती व ईतर स्पर्धा परिक्षा विषयावर तसेच शारीरीक चाचणी परिक्षा संबंधाने सविस्तर मार्गदर्शन केले. परिक्षेत असलेल्या सिलॅबस प्रमाणे अभ्यास केल्यास आपण परिक्षेत नक्कीच यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.याकरीता सर्वांनी तसा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.अग्नीवीर मध्ये भरती झालेल्या युवकांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर उपस्थीत २५-३० युवक-युवतींना पेन वाटप करुन सर्वांना सविस्तर मार्गदर्शन करुन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.सदर भेटी दरम्यान पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे, सशस्त्र दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अनिल टार्फे तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. मंगेश वानखडे वाचक फौजदार उपविभाग देवरी व अंमलदार हजर होते.

blank