कुडवा,केशोरी,बिंझली व लटोरी येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने पोलिसांचे रुट मार्च

0
27

गोंदिया,दि.15– आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने परीसरातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, भयमुक्त वातावरणात ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडावे, याकरीता रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम कुडवा,  केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीने  केशोरी व सालेकसा पोलीस स्टेशनच्यावतीने बिंझली व लटोरी येथे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे , अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया सुनील ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विजय भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर यांच्या उपस्थीतीत गावातुन मुख्य रस्त्याने रूट मार्च काढण्यात आले. तसेच बिंझली येथील मुख्य चौकात नागरिकांच्या उपस्थीतीत दंगाकाबु योजने अंतर्गत दंगा नियंत्रणा बाबत सराव घेण्यात आला.

आंबेडकर चौक कुडवा येथे दंगा काबु योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.तसेच रुट मार्च आंबेडकर चौक कुडवा – विठ्ठल रुख्माई मंदिर- ग्राम पंचायत कुडवा- मोठा हनुमान मंदिर – परत आंबेडकर चौक कुडवा पर्यंत रूट मार्च घेण्यात आले.यावेळी ठाणेदार रामनगर पो.नि. श्री. संदेश केंजळे, 04 सहायक अधिकारी व 29 अंमलदार हजर होते.सदर सरावाचे प्रात्यक्षीकाचे सादरीकरण झाल्याने कुडवा येथील गावक-यांमध्ये पोलीसांप्रती विश्वासाची व सुरक्षिततेची भावणा निर्माण झालेली आहे.

यावेळी सालेकसा ठाणेदार स.पो.नि.जनार्दन हेगडकर सा., सपोनि. थिटे सा., पो.उप.नि.पठाडे सा. हजर होते. सदर रूट मार्च व दंगा काबु योजनेच्या सरावात पोलीस स्टेशन सालेकसा, C-60 सालेकसा अंमलदार हजर होते.सदर सरावाचे प्रात्यक्षीकाचे सादरीकरण झाल्याने गावक-यांमध्ये पोलीसांप्रती विश्वासाची व सुरक्षिततेची भावणा निर्माण झालेली आहे. यावेळी केशोरी ठाणेदार पोनि. , विलास नाळे सा., सपोनि. शेख सा., तसेच एसआरपीफ ग्रुप क्रमांक १५ चे पो.नि. मडावी सा. हजर होते. सदर रूट मार्च व दंगा काबु योजनेच्या सरावात पोलीस स्टेशन केशोरी, आय. आर. बी. गट १५ चे पोलीस अंमलदार हजर होते.