36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान मंडळावर विराआंस चा हल्लाबोल आंदोलन

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान मंडळावर विराआंस चा हल्लाबोल आंदोलन

0
26

blank

▪️विदर्भातील 11 जिल्ह्यातून  विदर्भवादी कार्यकर्ते शामिल

गोंदिया:- २०२३ संपेपर्यंत विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने “विदर्भ मिळवू औंदा” या मागणीची पूर्तता करण्याकरीता “लाठी खाऊ गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेवू” “वेगळा विदर्भ, मिळालाच पाहिजे” असा घोषणा व निर्धार व्यक्त करून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विशाल मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर “हल्लाबोल आंदोलन” पासून आता आरपारच्या लढाईची सुरवात झालेली आहे, “शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंगे” या इर्षेने आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. हल्लाबोल आंदोलनात ११ ही जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते व “महाराष्ट्रवादी” चले जावो अशी घोषणा विधान मंडळावरील आंदोलनात करण्यात आली. गोंदिया जिल्हा विराआस तर्फे समन्वयक अतुल सतदेवे, गोंदिया शहर प्रमुख वसंत गवळी, उपाध्यक्ष भोजराज ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन मोर्च्यात असंख्य कार्यकर्ते शामिल झाले होते. या आंदोलन मोर्च्याचे नेतृत्व कोर कमेटी चे विराआस अध्यक्ष ऍड.वामनराव चटप (माजी आमदार), मा.प्रकाशभाऊ पोहरे (विदर्भवादी नेता) , रंजनाताई मामर्डे (अध्यक्षा, महिला आघाडी विदर्भ प्रदेश), डॉ. श्रीनिवास खांदेवाले (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व कोअर कमेटी नेते ), अरुणभाऊ केदार (अध्यक्ष, पूर्व विदर्भ), मुकेश मासुरकर (अध्यक्ष, युवा आघाडी विदर्भ प्रदेश) यानी केले.
यापुढील विधानसभा ही विदर्भाचीच होईल व महाराष्ट्राची असणार नाही व महाराष्ट्र वादी विदर्भातून हद्दपार होतील अशी अशा व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असून शेतकऱ्यांच्या भूअर्जन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरीता ६५ हजार कोटींचे कर्ज एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) ला उभे करावे लागत आहे व त्याला थकहमी ही सरकारची आहे आधीच ६ लाख ६० हजार कोटींचे कर्ज थकहमी व लायबिलिटीच्या डोंगराच्या बोझ्याखाली असलेले महाराष्ट्र राज्य कदापीही सक्षम होऊ शकत नाही म्हणून विदर्भातील जनता महाराष्ट्रात १०० वर्षे राहली तरी त्यांच्या अनुशेष भरून निघू शकत नाही. या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर ते म्हणजे ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य’.
या हल्लाबोल आंदोलन मोर्च्याची सुरवात आज १९ डिसेंबर ला दुपारी १ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडीयम वरून झाली आणि पंचशील चौक – झांशी राणी चौक – व्हेरायटी चौक – विधान भवन या मार्गाने आगेकूच करून विधानभवनावर मोर्चा धड़कला. या मोर्च्याला विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, कुणबी बहुजन पार्टी, भीम आर्मी संरक्षक दल, संविधान मैत्री संघ इत्यादी पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला असून विदर्भातील 11 ही जिल्ह्यात या आंदोलनाला विविध पक्ष व संघटना द्वारे मोठ्या प्रमाणात पाठिंबा प्राप्त झाला.
हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तात्काळ व्हावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांना 24 तास तास वीज देण्यात यावी. वैधानिक विकास मंडळ नको–विदर्भ राज्याच हवे. विदर्भातील 11 ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अन्नधन्न्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावा, बल्लारपूर – सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणी करण्यात आली.

blank