गंगटोक-सिक्कीमच्या जेमा येथे शुक्रवारी लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. यामध्ये 16 जवान शहीद झाले असून 4 जखमी झाले आहेत. एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि थेट दरीत कोसळल्याचे लष्कराने सांगितले. या वाहनासोबत लष्कराची आणखी दोन वाहने होती. तिन्ही वाहने सकाळी चट्टण येथून थंगूकडे जात होती. लष्कराचे बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे मृतदेह आणि जखमी जवानांना बाहेर काढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमी लवकरात लवकर बरे होण्याची कामना केली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले. त्यांच्या सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांचा कृतज्ञ आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकरात लवकर बरे होण्याची कामना करतो.
तीन फोटोजमध्ये पाहा दुर्घटनेची संपूर्ण स्थिती



नॉर्थ-ईस्टमध्ये झालेल्या दुर्घटना
1. 22 नोव्हेंबर रोजी सिक्कीममध्ये प्रशिक्षणादरम्यान, स्पेशल फोर्स युनिटचे सहायक लीडर लघ्याल यांचा पॅराशूट वेळेवर न उघडल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या वेळी ते भारत-चीन सीमेवर सराव करत होते. सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील रवांगला येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय लघ्याल यांना 22 वर्षांचा अनुभव असलेले पॅराशूट जम्पर होते. ते 8 वर्षे विकास रेजिमेंटशी संबंधित होते.
2. 24 जून रोजी सिक्कीममधील जुलुक येथे झालेल्या अपघातात फर्स्ट बटालियन सिक्कीम स्काउट्सचे दोन सैनिक मृत्युमुखी पडले. लान्स नाईक मनोज छेत्री आणि नायब सुभेदार सोम बहादूर सुब्बा अशी या जवानांची नावे आहेत. हे दोन्ही जवान झुलुक येथे काम करणाऱ्या मजुरांना घेण्यासाठी जात असताना धुक्यामुळे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले.
3. 21 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर ‘रुद्र’ क्रॅश होऊन पाच जवानांना प्राण गमवावे लागले होते. तूटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ हा अपघात झाला. ज्या भागात हा अपघात झाला तो भाग रस्त्याने जोडलेला नाही.