राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा

0
19

जेष्ठ सदस्य तथा राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या

गोंदिया,दि.23ः- नागपूर येथील अधिवेशनात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न देण्याकरीता रचलेल्या षड्यंत्राला वैतागून जेष्ठ सद्स्य जयंत पाटील यांनी सरकारचा निर्लज्जपणाचा कळस झाल्याचे वक्तव्य केले.हे शब्द संविधानिक असून सुद्धा बहुमताच्या आधारवर त्यांचे निलंबन करण्यात आले.या निलबंनाच्या व फडणवीस शिंदे सरकारच्या विरोधात गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ईडी’सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, विधिमंडळात 32 वर्षाचा दीर्घ अनुभव असलेले जेष्ठ सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फ़त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व राज्य सरकारला पाठवण्या0त आले.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेध मोर्चाला उधळून काढण्यासाठी सरकारच्या निर्देशावरून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.यावरून विरोधकांवर दडपशाहीचा प्रयोग सरकार करीत आहे, हे स्पष्ट दिसून येते, अशा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी याप्रसंगी केला.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, वीरेंद्र जैस्वाल, राजलक्षमी तुरकर, पूजा सेठ, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, चुन्नीभाऊ बेंद्रे, नीरज उपवंशी, रफीक खान, गणेश बरडे ,मोहन पटले, अशोक शहारे, हरजीत जुनेजा, नानू मुदलियार, सतीश देशमुख, विनीत शहारे, वेणेश्वर पंचबुधे, हेमंत पधरे,आशाताई पाटील, चंद्रकुमार चुटे, सुरेश हर्षे, रवीकुमार पटले, प्रेम जैस्वाल, राजकुमार एन जैन, मनोहर वालदे, खालिद पठान, सुशीला भालेराव, माधुरी नासरे, अजय हलमारे, कुंदा दोनोडे, दिनेश जयपुरिया, रवि मुंदडा, इकबाल सैय्यद, पदमलाल चौरिवार, भूपेंद्र पटले, गोविंद लिचडे, राजकुमार ठाकरे, नितिन टेंभरे, करण टेकाम, लवली होरा, आनद ठाकुर, हरगोविंद चौरसिया, रमेश कुरील, विष्णू शर्मा, एकनाथ वहीले, सुनील पटले, शैलेश वासनिक, नरहरप्रसाद मस्करे, पुरनलाल उके, सौरभ जैस्वाल, धर्मराज कटरे, राज शुक्ला, तुषार उके, विनायक शर्मा, गुड्डू बिसेन, गणेश डोये, अंगलाल कटरे, टी. एम. पटले, योगेश पतहे, नितिन टेंभरे, नागो सरकार, राजेश नागपुरे, जगदीश चौधरी, अनिल बावनकर, आशीष चौधरी, नितिन नागपुरे, आकाश मेश्राम, कान्हा बघेले, रौनक ठाकुर, लोकेश चिखलौंड़े, कपिल बावनथडे, नेहर प्रसाद उपवंशी, कुणाल बावनथडे, शेखर पटले, प्रकाश बनकर, यश बोरकर, श्रेयश खोब्रागडे, रोहित मेश्राम, सौरभ ननेश्वेर, विज्जु भैसारे, अरमान जैस्वाल, राज माने, गौरव येडे, राजू गौतम, प्रतिक हरिनखेड़े, सुरेंद्र रिनायत, सोनू रॉय, सुरेश कावळे, गुणवंत मेश्राम, कान्हा बघेले, राजू येडे, योगी येडे, शुभम कोल्हाड़लर, मनीष ठाकुर, कृष्णा भंडारकर, विजय वाघाडे, सरभ मिश्रा, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम मोर्चात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ता व् मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते.