41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक ‘मंडणगड योजना’ प्रमाणे विशेष मोहीम 384 महाविद्यालयांना ऑनलाईन वेबीनारद्वारे जात पडताळणीचे मार्गदर्शन

‘मंडणगड योजना’ प्रमाणे विशेष मोहीम 384 महाविद्यालयांना ऑनलाईन वेबीनारद्वारे जात पडताळणीचे मार्गदर्शन

0
37

नागपूर, दि.30 : नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 अखेर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर तर्फे ‘मंडणगड योजना’ प्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने वर्ग बारावी व अकरावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता प्रस्ताव पाठविणेबाबत तसेच ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रितीने कसे प्राप्त करावे याबाबत नागपूर जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वतीने “मंडणगड योजना” योजना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत आहे.

‘मंडणगड योजना’ प्रमाणे विशेष मोहीमेअतंर्गत नागपूर जिल्हयातील 384 शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि नोडल अधिकारी यांचे ऑनलाईन वेबीनार 24 व 25 नोव्हेंबर या दिवशी चार टप्प्यात आयोजित केले होते. या वेबीनारमध्ये मंडणगड पॅटर्न बारावी व अकरावीचे अर्ज मुदतीत सादर करणे, नोडल अधिकारी यांची भूमिका काय याबाबत समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे व उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये समता पर्व आणि मंडणगड योजनाबाबत माहीती दिली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. या वेबीनारला जिल्हयातील 384 महाविद्यालयातील नोडल अधिकारी व संबंधीत कामकाज बघणारे कर्मचारी उपस्थित होते.

सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे पालक यांनी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे त्यांचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत संबंधीत महाविद्यालयात सादर करावे. संबंधीत महाविद्यालयाने तत्काळ अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे तसेच अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज 1 जानेवारी पासून 31 मार्च 2023 पर्यंत महाविद्यालयात जमा करावे. सर्व कागदपत्रे साक्षांकीत असावी. मुळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे, खोटी कागदपत्रे सादर करू नये याची सूध्दा नोंद पालकांनी व महाविद्यालयांनी घ्यावी. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी कळविले आहे.

blank