
वाशिम : भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षापूर्वी घडलेल्या शौर्य दिनाच्या स्मृतीला अभिवादनाचा कार्यक्रम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बहुजन महिला भगीनीच्यावतीने करण्यात आला. याआधी बहुजन महिला भगिनीकडून शहरातून रॅली सुध्दा काढण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी शौर्य दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर भारीप बहुजन आघाडी मा. जिल्हाध्यक्ष मिनाताई उलेमाले, अनिता इंगोले, सेवानिवृत्त पोलिस निरिक्षक सुष्मा परांडे व मान्यवर महिलांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारती खडसे, उषा धबाले, अस्मिता खडसे, पुजा वानखेडे, संगिता धबाले, माया धबाले, दुर्गा धबाले, माया भगत, जया पावडे, बेबीबाई इंगळे, रेणूका खंडारे, चंदा कांबळे, राधाबाई सिरसाट, कल्पना कुकडे, अन्नपूर्णा खंडारे, वनिता जाधव, पुष्पा कांबळे, नंदाबाई बोरडे, राधाबाई इंगळे, कांचन धबाले, अंजु धबाले, लता धबाले, उमा धबाले, सुमन कांबळे, अरुण ताजणे, सिमा धबाले, लक्ष्मीबाई राळे, बेबी कांबळे, मीना धबाले, कौसाबाई धबाले, रंजना धबाले, उन्नता कांबळे, रुपाली खडसे, पुनम राळे, अन्नु खडसे, सुभद्राबाई टिपरे, जनाबाई धबाले, दुर्गा धबाले, रुचिता वानखेडे, वंदना भगत, रेखा कांबळे, अनिता इंगोले, सुष्मा परांडे, मीरा वैद्य, ज्योती इंगोले, वर्षा वानखेडे अनिता वानखेडे व मान्यवर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिरामन मोरे व आभार प्रदर्शन रुचिता वानखेडे यांनी केले.





