
गोरेगाव,दि.०३ः तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील स.शिक्षीका कु.ममता गणविर,स.शि.प्रियांक पटले तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर व त्यांनी केलेल्या कार्याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन व्ही.एस.मेश्राम तर आभारप्रदर्शन श्रीमती भारती कटरे यांनी केले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
इटखेडा ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत इटखेडा साजरी करण्यात आली .याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बद्दल सरपंच सौ आशाबाई झिलपे ,माजी सरपंच उद्धव मेहंदळे इंद्रदास झिलपे व इतरांनी मार्गदर्शन केले .यावेळी नवनिर्वाचित सरपंच नवनिर्वाचित सरपंच आशाबाई झिलपे ,ग्रामपंचायत सदस्य सौ माया नत्थु धांडे ,वर्षा नितेशकुमार कावळे, वर्षा गिरीश कोटरंगे ,छाया जागृत लोणारे ,उज्वला समीर गोंडाने, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय नामदेव कांबळे, सचिन गुरुदेव लांजेवार, आशीर्वाद सुभाष लांडगे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोरेश्वर मिसाळ ,मधुकर मेहेंदळे,,घनश्याम गोठे सदाशिव लांडगे, नमोदेव कुंभळवर, तुळशीदास गोंडाने, अर्जुन कोरचे ,एकनाथ वलथरे ,ग्रामरोजगार सेवक आनंदराव मेहंदळे,हेमंत मिसार इतर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्रीकांत ठाकरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
गडचिरोली: भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक, पहिल्या महिला शिक्षिका कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काँग्रेस नेत्या माजी जि.प. सदस्य कुसुमताई अलाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत पा. राऊत, काँग्रेस नेते भैय्याजी मुद्दमवार, अब्दुल भाई पंजवानी, राकेश रत्नावर, गौरव आलम, सदाशिव कोडापे, बाबुराव गडसुलवार, मिलिंद बारसागडे, रुपेश सलामे, सुदर्शन उंदीरवाडे, सुधीर बांबोडे, अमित चांदेकर, रजत धकाते, तया खान उपस्थित होते.