23.5 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ सावित्रीआई फुले यांचा जीवन संघर्ष महिलांच्या उन्नतीचा मार्ग-नम्रता खडसे

सावित्रीआई फुले यांचा जीवन संघर्ष महिलांच्या उन्नतीचा मार्ग-नम्रता खडसे

0
27

यवतमाळ,दि.09- येथील महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नम्रता खडसे अध्यक्ष सत्यशोधक अध्यापक मंडळ यवतमाळ या होत्या .याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते म्हणाल्या ,सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष आपल्या सर्वांनी महिलांच्या मुक्तीचा मार्ग आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे .त्यांचं साहित्य आपण स्वीकारलं पाहिजे .त्यांची काम करण्याची पद्धत आपण स्वीकारली पाहिजे .सुखी संसाराचा मंत्र हा सावित्रीबाई फुले च्या जीवन संघर्षातून आपल्याला मिळतो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर दिपालीताई भूम काळे ह्या होत्या. प्रमुख अतिथी सुहासिनी भोजने ,मनीषा तिरणकर,माधवीताई चिंचोळकर,अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला मंडळ,जयमलाताई वानरे यांच्या हस्ते सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुनिता काळे,वंदना जवळकर यांनी सावित्रीच्या जीवनावर गीत सादर केले.आयोजक मायाताई गोरे यांनी प्रास्ताविक केले. सत्यशोधक स्टडी सर्कल यांच्या सौजन्याने नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी अशोक मोहूरले,दीपक वाघ,प्रा.सविताताई हजारे,गणेशराव सुखदे उपस्थित होते. मनीषाताई तीरंकर यांना रत्नश्री 2022 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.विद्या वरके या विद्यार्थिनीने सावित्री आईच्या जीवनावर प्रकाश टाकला. चांदोरे नगर मधील महिला भगिनींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजना कांबळे,तर सुंदर सूत्रसंचालन संध्या वायकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुधा वाघमारे, सुनंदा कांबळे, रत्नमाला कंगाले ,माया भगत व समस्त चांदोरे नगर यवतमाळ येथील महिलांनी सहकार्य केले.