24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home Top News ‘उर्फी जे करतेय त्यात काहीच वावगे नाही’: अमृता फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

‘उर्फी जे करतेय त्यात काहीच वावगे नाही’: अमृता फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

0
33

आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे उर्फीदेखील त्यांना चिथावण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीये. नुकतेच तिने ‘डीपी मेरा धासू, चित्रा मेरी सासू’ म्हणत त्यांना जोरदार टोला लगावला आहे. आता हा वाद कुठवर जाणार हे येणार काळच सांगेल. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जे करतेय त्यात वावगं काहीही नाही
पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी उर्फी प्रकरणी त्यांचे मत मांडले. उर्फी एक स्त्री म्ङणून जे काही करतेय, त्यात मला वावगं काहीही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता यांनी दिली आहे.

blank

अमृता फडणवीस म्हणाल्या, “काहींची व्यावसायिक गरज असते. त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसे फिरत असाल, तर ते ठिक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे.”

त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्याप्रकारे त्या कृतीही करत आहेत. माझ्या मते, उर्फीने सार्वजनिक ठिकाणी आणि तिला व्यावसायिकदृष्ट्या जिथे कमिटमेंट नाही आहे अशा ठिकाणी ती संस्कृतीप्रमाणे राहिली तर चांगले आहे. एक स्त्री म्हणून मला असे वाटते की, उर्फीही एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करतेय. त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया अमृता यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘मूड बना लिया वे’ 6 जानेवारीला रिलीज झाले आहे. हे गाणे स्वत: अमृता यांनी गायले आहे. या गाण्याला रिलीज होताच 2.3 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाणी गायली आहेत, मात्र त्यांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत गाणे रेकॉर्ड केले आहे. हे गाणे टी-सीरीजच्या बॅनरखाली रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडी मीत ब्रदर्सनेदेखील गायक म्हणून आहेत.

  • अमृता फडणवीस यांचे डान्स चॅलेंज:व्हिडिओ शेअर करत लिहिले- माझ्या स्टेप्सवर डान्स करा, रील बनवून पाठवा
blank

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डान्स करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ पोस्ट करण्याचे चॅलेंज दिले आहे. त्यांचे नवीन गाणे ‘मूड बना लिया वे’ 6 जानेवारीला रिलीज झाले आहे. हे गाणे स्वत: अमृता यांनी गायले आहे.