जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव यांनी ही माहिती दिली. ‘पापा इज नो मोअर’ असे शुभाशीनीने ट्विटमध्ये लिहिले आहे. ते 75 वर्षांचे होते.

शरद यादव यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 9 वाजता त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालू यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यासोबत राहिलेल्या नेत्यांमध्ये शरद यादव यांचा समावेश होतो. नितीश कुमार यांच्याशी राजकीय संबंध बिघडल्याने शरद यादव एकाकी पडले. गंभीर आजारी असल्याने त्यांची राजकीय कामेही बरीच कमी झाली होती.






