23.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home शैक्षणिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत चिरचाळबांधचा विद्यार्थी दिपांशु पटले प्रथम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत चिरचाळबांधचा विद्यार्थी दिपांशु पटले प्रथम

0
23

आमगाव -तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील वर्ग १० वीचा विद्यार्थी दिपांशु पटले याने आमगाव येथील आदर्श हायस्कूल येथे आयोजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मेळाव्यात वर्ग ९ ते १२ या गटात प्रथम क्रमांक पटकवाल. दिपांशु पटले यांनी शिक्षक एल.एफ. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसिपी प्रयोगाचे माॅडेल तयार केले होते.तालुका प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकाविला त्या बद्दल बहुजन हिताय जगत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी जे.एस.राहागडाले, सचिव एन.एन.येळे, संचालिका विमलताई राहांगडाले, हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील प्राचार्य बन्सीधर शहारे प्रा.आर.एच.बांदरे, परमानंद चुटे, के.जी मडावी,धर्मेंद्र मेहर,आर.यु .बागळकर आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.blank