तुमसर : 12 जानेवारी हा एक ऐतिहासिक दिवस म्हणून मानला जातो कारण एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येता़े.विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे स्वामी विवेकानंद उर्फ विरेश्वर विश्वनाथ दत्त यांची १२ जानेवारी रोजी जयंती. हा दिवस `राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो व स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती. राजमुद्रा ग्रुप च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली,स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाचे गीता कोंडेवार,कल्याणी भुरे,विजया चोपकर,कुंदा वैद्य,अदिती काळबांदे,मधुमती साखरवाडे,श्रुती कावडे,पल्लवी निनावे,वंदना आकरे,प्रीती मलेवार,पल्लवी पाटील, अलका देशमुख,पदमा बीसन, उमा साखरवाडे,जयश्री गभने,विद्या खरवडे, कविता पासवान, कविता साखरवाडे, नंदा डोरले,योगिता बावनकर,वनिता मलेवार,अश्विनी बडवाईक,नेहा मोडघरे, करुणा धुर्वे,अनिता बडवाईक, सपना सोनवाने, तृप्ती बडवाईक,सोबतच राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष इंजि. सागर गभने, शुभम बानासूरे, सागर भुरे, स्वप्निल डुंबरे, अनुप तिडके, बापू बडवाईक, सोमेश्वर लांजेवार,संकेत गजबिये,अर्पित खानोरकर, बालेश्वर लांजेवार,प्रतीक निखाडे, हर्षल मलेवार, भावेश पाल,व राजमुद्रा ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते.





