41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ कचारगड यात्रे निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुर्वतयारी आढावा

कचारगड यात्रे निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुर्वतयारी आढावा

0
25

blank

गोंदिया,दि.13 : सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे दिनांक 3  ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत यात्रा होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पुर्वतयारी आढावा घेतला.

         सभेला निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कचारगड  देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे म्हणाले, कचारगड यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत अखंडीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत लाईनच्या खाली दुकाने लावण्यात येऊ नये. वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था, औषधांचा पुरवठा पुरेशा प्रमाण ठेवण्यात यावा. यात्रे दरम्यान एस.टी.महामंडळाची किमान 15 बसेसची व्यवस्था करण्यात यावी. येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर कुणीही नारळ फोडू नये याची दक्षता घ्यावी. भोजनदानमध्ये शिळ्या अन्नाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. नगर परिषदेने अग्नीशमन वाहनाची व्यवस्था करावी. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात यावी. अनुचित घटना घडू नये यासाठी गॅस सिलेंडर बाबत दक्षता घेण्यात यावी. यात्रेला व्हीव्हीआयपी पाहुणे आले तर गैरसोय होऊ नये म्हणून हेलिपॅडची व्यवस्था करुन ठेवावी. यात्रे दरम्यान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.