तिरोडा:- तिरोडा तालुक्यात सिंचन विकासामध्ये आमदार विजय रहांगडाले यांचे महत्वपूर्ण कार्य असून त्यांच्या कारकिर्दीत धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा १ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.२ च्या योजनेकरिता २९० कोटी फडणविस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाइनच्या कामाला सुरुवात आली आजपावेतो ८० टक्के काम प्रगतीवर आहे. त्याचबरोबर भुराटोला लघु मध्यम प्रकल्पाकरिता २१ कोटी रुपये मंजूर करवून घेतले यामध्ये सन १९७२ पासून २००६ पर्यंत निमगाव येथील आंबेनाला येथे प्रकल्पाला सुरु करण्याकरिता अनेक लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले. आमदार विजय रहांगडाले यांनी सन २०१५ पासून टप्या टप्प्याने निमगाव प्रकल्पाला मंजुरी करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला व महाराष्ट्र शासनाद्वारे वनजिव विभागाचा प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमीनीच एफआरए निधी ३१ कोटी शासनास भरणा करण्यात आला. सदर प्रकल्प हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० कि.मी.अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची मंजुरीकरिता सन मे २०२० मध्ये पाहणी करून ११ फेब्रुवारी २०२० ला ३१.७१ लक्ष व १६ फेब्रुवारी २०२१ ला १२.९२ लक्ष रुपये असे एकूण ४४.६३ लक्ष प्रकल्प यंत्रणेस भरले असून वन्यजीव मान्यतेच्या सर्व बाबी पूर्ण झालेल्या असून पानवहाळ क्षेत्राचा विकास आराखडा शासनाकडून येत्या पंधरवाड्यात मंजूर होणार आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजना लवकारात लवकर कार्यान्वित होऊन तिरोडा तालुक्यातील शेतक-यांना शेतील पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे कामांना गती मिळावी. तसेच टप्पा १ अंतर्गत पंपाच्या विशेष दुरुस्तीकरिता निधी मंजुरीकरिता तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश आमदार महोदयांनी संबधित विभागास दिले. विदर्भ पाटबंधारे विकासमहामंडळ नागपूर कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये प्रामुख्याने कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता रा.श्री सोनटक्के, क.सु.वेम्लगोंडा, मुख्यअभियंता, आशिष देवगडे, उपविभागिय अभियंता पंकज गेडाम,प्रणय नागदिवे उपस्थित होते.