नागपुरातील आंबेडकर भवन पाडण्याचा मुद्दा पेटला

0
11

नागपूर : अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचा मुद्दा पेटला असून, शुक्रवारी दोन ठिकाणी आंदोलने झाली. डॉ आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने उद्यान परिसरात, तर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झाले. या आंदोलनात आंबेडकर भवनासह इतरही मुद्यांचा समावेश होता.

डॉ. आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने अनेकवेळा या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मात्र, शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. स्मारक बचाव कृती समिती सातत्याने याचा पाठपुरावा करीत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरला मोर्चा काढून मंत्र्यांना निवेदने देण्यात आली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे, सरकारच्या चालढकलीच्या निषेधार्थ शुक्रवारी अंबाझरी स्मारकाच्या गेटसमोर महिलांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.