40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ शिविगाळ करणारा कंत्राटी आरोग्य कर्मचारी नोकरीतून कार्यमुक्त

शिविगाळ करणारा कंत्राटी आरोग्य कर्मचारी नोकरीतून कार्यमुक्त

0
55

गोंदिया: गोरगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेवक असलेल्या राहुलगिरी गोस्वामी याला शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच महिला कर्मचारीसोबत असभ्य वर्तणुककेल्याबद्दल 20 जानेवारी रोजी नोकरीतून निलबिंत करण्यात आले आहे.जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने निलबंनाचे पत्र काढून तत्काळ कार्यमुक्त करुन सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सदर कंत्राटी कर्मचारी राहुलगिरी गोस्वामी याने 13 जानेवारीला दारूच्या नशेत आरोग्य केंद्रात गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर त्याला हटकणाऱ्या महिला आरोग्य सेविकेला शिवीगाळ केली.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी गंगाझरी पोलिसांत आरोपी राहुल गोस्वामी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.त्यामुळे त्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे.