41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ कार्यक्रमास बोलावले नाही म्हणून आमदार संतापले!, शिवीगाळ केली, मारायला धावले…

कार्यक्रमास बोलावले नाही म्हणून आमदार संतापले!, शिवीगाळ केली, मारायला धावले…

0
21

blank

वर्धा : कार्यक्रमास बोलावले नाही म्हणून कंत्राटदारास चक्क शिवीगाळ करीत मारायला धावण्याचा प्रकार भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी केला. कारंजा तालुक्यातील दानापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गावचे सरपंच काँग्रेसचे असल्याने त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना कार्यक्रमात बोलावले. ते भूमिपूजन करन निघत नाही तोच आमदार केचे पोहचले. झाला प्रकार पाहून ते चांगलेच संतापले व त्यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ केली. ते मारायला धावल्याची चित्रफीतही प्रसारित होत आहे. आमदार केचे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी अधिकाऱ्यास फोन लावत कंत्राटदाराचे देयक काढायचे नाही म्हणून धमकावले.