शिक्षकांकडून सामाजिक बांधिलकी शिवप्रेमी भाविक भक्तांना मठ्ठा वितरण..!

0
14

 अर्जुनी मोरगाव- महाशिवरात्री व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर शिक्षक मित्रपरिवार अर्जुनी मोरगाव कडून शिवप्रेमींना मठ्ठा वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कृतीत उतरविणे ही काळाची गरज आहे, हाच धागा पकडून व महाराजांना प्रेरणास्थानी ठेवून अर्जुनी मोर.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन आर्थिक सहकार्यातून महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पावन पर्वावर भाविक भक्तासह शिवप्रेमींना मठ्ठा वितरण केले. तालुक्यात शिक्षक मित्र परिवारातर्फे शिक्षक बांधवांच्या समस्या सोडविण्यासोबतच आदर्श समाज निर्मितीसाठी व सामाजिक एकोप्यासाठी अशा स्वरूपाचे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची शिकवण देणे हा उद्देश आहे. महापुरुषांच्या विचारांना कृतीत आणण्याचे मोलाचे कार्य या माध्यमातून होत असल्याने समाजाच्या सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास हांडगे,राजेश साखरे, प्रशांत चव्हाण, किशोर लंजे,नितीन तिडके, भीमराव रामटेके,पुनाराम जगझापे, अरुण फाये, सुरेंद्र भैसारे, फालचंद कोरे, जगदीश मेश्राम, संजय कोरे, मंगेश ढोमणे, रवींद्र वालोदे, विनोद चव्हाण,नरेश लंजे, नागेंद्र खोब्रागडे, शेषराव दहीकर, रूपचंद मुंगमोडे, रमेश जांभुळकर, गजानन रामटेके, मधुकर राठोड, वसंतराव नाकाडे,शरद लंजे, गंगाधर निखारे, विलास शहारे,उमेश तुमरामे, सुनील बडोले,अमोल चौरे, केशव कोल्हे,विठोबा रोकडे,राजेश मरघडे, संदेश शेंडे व इतरही बहुसंख्य शिक्षकांनी परिश्रम घेतले