35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक जागतिक एसओएफ ओलंपियाड परीक्षेत ” एक्यूट पब्लिक शाळेचे सुयश”

जागतिक एसओएफ ओलंपियाड परीक्षेत ” एक्यूट पब्लिक शाळेचे सुयश”

0
24

blank

गोंदिया,दि.19ः- जागतिक एसओएफ ओलंपियाड गणित, विज्ञान, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयासाठी जागतिक स्तरावर वैज्ञानिक निर्माण करण्याकरिता प्रत्येक वर्षी शालेयस्तर व जिल्हास्तरावर परिक्षेचे आयोजन करते.या शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ ला विद्यार्थी शास्त्रंज्ञ व प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याकारिता गोंदिया जिल्हास्तरावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यात एक्यूट पब्लिक स्कूल गोंदिया येथील वर्ग १ ते ६ वी या वर्गामधून ३२ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत सहभाग घेतला. त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. त्यात कु. कृतिशा बागड़े १ ली, प्रत्युष बागड़कर ३ री, आदित्य ठाकुर ४ थी, उमंग मस्के ४ थी, आलेहा शेख़ ४ थी, हर्ष बुराडे ४ थी, रिद्धि पटले ४ थी, शगुन पारधी ५ वी, नैतिक थानथराटे ५ वी, शरद तुरकर ६ वी, संकल्पना कोहळे ६ वी, माही बनोटे ६ वी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कु. निशा अंबुले ५ वी, देवांश मानकर ३ री, श्रावणी वर्हाड़े २ री, रुची बिसेन २ री, टीया मंगर १ली, मनन गजभिये ४ थी, कल्पक तुरकर २ री, फाल्गुन मंगर ५ वी, तन्मय कूथे ४ थी, हर्षल मंडियां ५ वी, पीयूष कुमार शाहू ४ थी, अल्पेश ऋषि ४ थी, मानसी लटाये ४ थी, श्रद्धा रहांगडाले ६ वी, वैष्णवी शिवनकर ५ वी, माहिरा ख़ान ३ री, भानुप्रताप सिंह कछवाह १ली, अहम रामटेके ६ वी हे विद्यार्थी प्रविण्य श्रेणित उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टिने शाळेतर्फे १५ एप्रिलला आयोजित सत्कार सोहळ्याला संस्थेचे सचिव संजय भास्कर,सह सचिव शुभा शाहारे,मुख्याध्यापिक, शिक्षक, शिक्षिका व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय संस्थासचिव,मुख्याध्यापिका, शिक्षकशिक्षिका व आई – वडिलांना दिले.

blank