तिरोडा-चोरखमारा येथे नागझिरा वन्यजीव अभयारण्य असून या ठिकाणी विविध प्रांतातून पर्यटक भेट देत असतात पर्यटकांना गैरसोय होऊ नये याकरिता रस्ते विकास होणे गरजेचे आहे याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून चोरखमारा येथे एकूण ७0 लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यामध्ये आदिवासी ३0५४ अंतर्गत चोरखमारा कोसमतोंडी रस्ता बांधकाम १0 लक्ष, साकोली फाटा चोरखमारा रस्ता बांधकाम १0.00, चोरखमारा पिटेझरी रस्ता बांधकाम १0 लक्ष, चोरखमारा कोसमतोंडी रस्ता बांधकाम १0 लक्ष, चोरखमारा डॅम रस्ता बांधकाम १0 लक्ष, चोरखमारा अप्रोच रस्ता बांधकाम १0 लक्ष, चोरखमारा पोच मार्ग रस्ता बांधकाम १0 लक्ष या कामांचा समावेश असून भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, प.स.सदस्य तेजराम चव्हाण,सौ. दिपाली टेंभेकर, सरपंच कांचन रामटेके, वरिष्ठ कार्यकर्ता उमेश पटले, वसंता कुंभरे, पर्यटन मित्र आशिष पारधी व गावकरी उपस्थित होते.





