24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home विदर्भ गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको; निकृष्ट कामांवर होणार कठोर कारवाई: सार्वजनिक बांधकाम...

गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको; निकृष्ट कामांवर होणार कठोर कारवाई: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

0
14

सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजचा प्रस्ताव सादर करणार

गडचिरोली (प्रतिनिधी):गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही; निकृष्ट अथवा सदोष कामे आढळल्यास चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी दिला.

अतिवृष्टी व पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील सर्व पुलांचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले. पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता आणि आवश्यक दुरुस्तीचा अहवाल तयार करून पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र विशेष पॅकेजचा सर्वंकष प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुद्दे व विकासकामे:२,७५२ कोटींचे रस्ते प्रस्ताव: AIIB अंतर्गत जिल्ह्यातील २७७.६० किमीच्या सहा महत्त्वपूर्ण रस्त्यांसाठी २,७५२ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर.मायनिंग कॉरिडॉरचा आढावा: सुमारे ४९२ कोटी रुपयांच्या मायनिंग कॉरिडॉरअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांचा सविस्तर आढावा.प्रत्यक्ष पाहणी व पाहणी दौरा: कोनसरी प्रकल्प, चामोर्शी–हरणघाट रस्ता, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ परिसरातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी.भविष्याची तयारी: वाढत्या औद्योगिक विकासासोबत अवजड वाहतुकीची गरज लक्षात घेऊन मजबूत व दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्धार.