28.2 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home Top News कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक

कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक

0
22

राजापूर:-बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाबद्दल मोठी बातमी आहे.रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल राजापूरमध्ये अटक झाली.. त्यांच्यासोबत अन्य दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांनाही सध्या रत्नागिरीत ठेवण्यात आलं आहे.

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे.. दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला,काल राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

कोकणातले सर्वपक्षीय राजकारणी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनापासून लांब

कोकणात रिफायनरी विरोधात स्थानिकांनी भूमिका घेतलेली असताना कोकणातले सर्वपक्षीय राजकारणी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनापासून लांब आहेत. कोकणातल्या रिफायनरीचा नाणार ते बारसू – सोलगाव हा प्रवास पाहिल्यास सुरुवातीला स्थानिकांच्या सोबतीन किंवा स्थानिकांचा आवाज तो आमचा आवाज म्हणत रिफायनरी विरोधातल्या आंदोलनात उतरलेले सर्वपक्षीय राजकारणी यापासून दूर आहे. प्रकल्पाचे समर्थन किंवा विरोध या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मुख्य बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वेळ पडल्यास कोकणात येण्याचा इशारा दिला आहे. पण ज्यांच्या मतदार संघात, ज्यांच्या भागात हे रिफायनरी विरोधातले आंदोलन केलं जात आहे. त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र यापासून दूर आहेत.

उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आद (25 एप्रिल) कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार आहे. सध्या पोलीस बळाच्या होत असलेल्या वापरावर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहे. दुपारी ही पत्रकार परिषद असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे हे राज्यपालांची देखील भेट घेणार आहेत.